IPL 2024 – मालिका अंतिम टप्प्यात.प्लेऑफ साठीची शर्यत होणार अजूनही अवघड. आजच्या सामन्यावर लक्ष. IPL-2024 अंतिम टप्प्यात आली तरी प्लेऑफ साठी कोण पत्र ठरणार याची उत्सुकता लागलेली आहे. प्रत्येक संघाचे १२ सामने झाले तरी अजून ८ संघांच्या आशा प्लेऑफ मध्ये खेळण्यासाठी कायम आहेत. केवळ मुंबई इंडियन्स हा एकच संघ प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे .
हैदराबाद वि. लखनौ
सामना क्रमांक ५७ सनराईझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट यांच्यात हैदराबाद येथे खेळण्यात आला . त्यांच्या एका सामन्याने गुणतलिकेवर मोठे बदल दिसून आले . या सामन्यात हैदराबाद ने लखनौवर १० गडी राखून विजय मिळवला . त्यांचे एकूण गुण त्याचबरोबर त्यांच्या या विजयाने ते गुण तलिकेवर ३ऱ्या क्रमांकावर आले. त्यांचे १२ सामने झाले असून १४ गुण झाले आहेत.
लखनौ कडून सुरुवात सुमार झाली . त्यांची अवस्था ६ षटकानंतर २७/३ अशी होती. पॉवर प्ले मध्ये ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे.
त्याला कारणीभूत ठरली भुवनेश्वर कुमार याची कसलेली गोलंदाजी त्याने ४ ओव्हर मध्ये ३ च्या सरासरीने फक्त १२धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. लखनौला या अवस्थेतून बाहेर निकोलस पुरण याच्या ४८* नाबाद आणि आयुष बदोनी च्या ३० चेंडूत नाबाद ५५ धावा यांनी बाहेर काढले. यांच्या मुळे लखनौ १६५/४ अशी धावसंख्या होती.
विजयासाठी हैद्राबादला १६६ धावांची आवश्यकता होती. ते त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग ९.४ षटकात पूर्ण केले.
हैदराबाद कडून अभिषेक शर्मा याने ६ षटकार आणि ८ चौकराच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ७५ धावा केल्या . त्याच्या सोबत या मोसमात जोरदार फॉर्म मध्ये असलेला ट्राविस हेड याने देखील ८ चौकार आणि षटकार यांच्या मदतीने ३० चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या . त्याने या मोसमातील आपले चौथे अर्धशतक केवळ १५ चेंडूत पूर्ण केले.
या सामन्यानंतर मुंबई चे आवाहन संपुष्टात आले आहे . पंजाब किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्या सामन्यातील विजेत्या संघाचे आवाहन आणि प्ले ऑफ मध्ये जायच्या आशा कायम राहतील. या सामन्यानंतर गुणतालिकेत बदल पाहायला मिळतील.
ipl अपडेट्स साठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम करायचंय ? क्लिक करा