Makeup good or harm ? – सुंदर की कुरूप ? संपूर्ण सत्य

Share

      Makeup good or harm ? – सुंदर की कुरूप ? संपूर्ण सत्य. सौंदर्यप्रसाधने किंवा make-up हा शब्द काही नवीन नाही.पण काय आहेत सौंदर्य प्रसाधने ? हे सर्व खरच वापरले पाहिजे का? याचा शरीराला फायदा काय? अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नावर चर्चा करणे गरजेचे आहे.

सौंदर्यप्रसाधने म्हणजे काय?

शारीरिक सुंदरता वाढवण्यासाठी किंवा  शारीरिक नैसर्गिक वैशिष्यांना आणखी सुंदर बनवण्या साठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी यांना सौंदर्यप्रसाधने असे म्हणले जाते.
नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या या वस्तू सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. त्याच बरोबर शरीरावरील एखादे व्यंग लपविण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो. जसे की चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी विविध उत्पादने वापरली जातात.
केवळ त्यांची सुंदरता तात्पुरती न वाढवता चिरकाल टिकेल अशीही काही उत्पादने आहेत. विविध प्रकारचे शाम्पू आज बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांच्या मदतीने केसांचे आरोग्य सुधारले जाते, त्यांना चकाकी येते.
फक्त वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून बनवलेली उत्पादने म्हणजेच सौंदर्य प्रसादने आहेत असे नाही.नैसर्गिक घटकांचा वापर करून देखील चेहऱ्याची निगा राखली जाते व सौंदर्य वाढवले जाते. चेहऱ्यावर तेज येण्या साठी लावलेली हळद हे सुद्धा याचच उदाहरण आहे.
हजारो वर्षांपासून शृंगारासाठी यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.प्राचीन ईजि्प्तशियन काळात याचा वापर अढळून येतो.

सौंदर्य प्रसाधनांनी त्वचा खराब होते !! बरोबर की चूक?
सौंदर्यप्रसाधने फक्त रसायनांचा वापर करून किंवा फक्त मोठ्या कंपन्यामध्ये बनवलेल्या नसतात.काही नैसर्गिक घटकांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बनवलेले ही असतात . त्यामुळे सर्वच सौंदर्यप्रसाधने खराब असतात असे म्हणता येणार नाही.
त्वचा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे आणि त्याची निगा राखणे देखील गरजेचे आहे . चेहऱ्यावर वरील त्वचा शरीरापेक्षा नाजूक असते त्यामुळे विशिष्ट ऋतुमध्ये चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन यामुळे त्वचेला बाहेरील घटकान पासून इजा होत नाही.सौंदर्य प्रसाधने ( make up) हानिकारक केव्हा ठरतो  – 
सौंदर्य प्रसाधने वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊन त्वचा खराब होण्याची शक्यता असते.
१) सौंदर्य प्रसाधने वापरताना स्वच्छतेकडे लक्ष देणे फार गरजेचे आहेत.
२) एखाद्या उत्पादनाची अ‍ॅलर्जी असल्यास ते टाळलेलच बर.
३) मेक अप करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे जर वेळोवेळी साफ नसेल तर चेहऱ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
४) चेहरा योग्य पद्धतीने किंवा पूर्ण स्वच्छ केला नाही तरीसुद्धा हानिकारक ठरतो.
या मुळे वेगवेगळे त्वचेचे आजार होतात.

चांगली सौंदर्य प्रसाधने कशी निवडावी?

प्रत्येक व्यक्तीचा स्किन टोन म्हणजेच शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या छटा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार त्या व्यक्तीने आपल्या साठी सौंदर्य प्रसाधने घ्यावीत. ब्रँड किंवा कंपनीच्या नावावर न जाता त्यातील घटक बघितले पाहिजे.

सौंदर्याचा व्यापार!

शारीरिक सुंदरता या कडे लोक आजकाल जास्तच आकर्षित झालेले आहेत.सुंदर दिसण्या करिता वेगवेगळ्या मार्गाचा वापर ते आज करत आहेत. पावडर पासून ते महागड्या सर्जरी लोक करत आहेत.
त्यामुळे या व्यवसायात भरपूर पैसे आहेत हे लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्त नफा मिळविण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात.
– कमी दर्जा चा कच्चा माल वापरणे.
– व्यवस्थीत चाचणी न करता उत्पादन बाजारात आणणे.
-शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन न करणे.

या सर्वांमुळे व्यावसायिकाला नफा मिळतो परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम सर्व सामान्य लोकांना भोगावा लागतो. विविध त्वचेचे विकार यामुळे उद्भवतात

हेल्थ आणि अश्या अनेक विषयांबद्दल वाचण्यासाठी क्लिक करा

वर्क फ्रॉम होम चे अनेक मार्ग जाणून घ्या


Share

Leave a Comment