Covishield vaccine चे सत्य
३० एप्रिल २०२४ रोजी रात्री ९वा.१६ मी च्या सुमारे Astrazeneca या संस्थने एक धक्कादायक खुलासा केला. जगभरात सर्वात जास्त प्रमाणात वापरण्यात आलेल्या कोविड -१९ च्या लसिमधील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या Oxford astrazeneca ज्याचे नाव भारतामध्ये Covishield व युरोप मध्ये Vaxzevria असे ठेऊन Serum Institute of India तयार करत होते,त्या लासीमुळे विविध दुष्परिणाम होतात. Astrazeneca ही मूळची ब्रिटिश संस्था आहे. २०२१ च्या कोविड लाटे नंतर भारताची Serum Institute of India व Astrazeneca या दोन संस्थांनी या लसीचे निर्माण व उत्पादन करून भारत व परदेशात लसिकरणासाठी निर्यात केले.
Astrazeneca या संस्थेवर UK मधील कोर्ट मध्ये केस चालू असताना संस्थेने असे कबूल केले की या लसीमुळे विविध दुष्परिणाम होऊ शकतात. TTS (Thrombosis with Thrombocytopenia Syndrome) हा त्यातील एक मुख्य दुष्परिणाम ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होऊ शकतात. ९०% भारताच्या जनतेला ही लस दिली गेली असून या मुळे खळबळ उडाली आहे.
या मागचे सत्य जाणून घ्या की या लसीमुळे होणारा कोणताही दुष्परिणाम लस घेतल्यावर २ ते ६ आठवड्यात होईल पण त्या पेक्षा जास्त कालावधी मध्ये होणारे परिणाम हे लसीचे नाहीत.या उलट कोविड-१९ मुळे होणारे हृदयविकाराचे धक्के व stroke सारख्या जीवघेण्या आजारांची शक्यता व पुन्हा कोविड-१९ ची लागण होण्याची शक्यता कमी होणे हे सर्व लसीकरणाचे फायदे असून आता घाबरण्याची काही गरज नाही असे आश्वासन, डॉ.ईश्वर, महासचिव पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन- मुंबई , इंडिया,(people’s health organization mumbai,India) यांनी दिले.
लेटेस्ट मराठी बातम्यांसाठी क्लिक करा https://knowit4u.com/category/latest-news/
वर्क फ्रॉम होम ऑप्शन साठी क्लिक करा https://jobsearchmade.blogspot.com/
फेसबूक https://www.facebook.com/profile.php?id=61559398190729
3 thoughts on “Covishield Vaccine – जीव वाचवले की धोक्यात घातले? जाणून घ्या सत्य”