Election commission of India – जाणून घ्या काय आहे निवडणूक प्रक्रिया आणि कोण आहे आधारस्तंभ ! देशभरात लोकसभा निवडणुकीची लगबग चालू आहे . प्रचार सभा , प्रचारासाठी लढविलेल्या वेगवेगळ्या शक्कल,वापरलेले वेगवेगळे प्रकर आणि प्रचार माध्यमामध्ये सर्व जणं गुंतलेले आहेत .Impact-Site-Verification: d83130de-657a-4909-9177-ee01467443a0 knowit4u.com
सर्व सामान्य माणसांना निवडणूक फक्त प्रचार आणि मतदान इथकीच माहीत आहे पण त्या मागील निवडणूक आयोगाने घेतलेले कष्ट ,नियोजलेली कमिटी व त्यांच्या मदतीने साधलेले नियोजनबद्ध मतदान या सर्व गोष्टींचा समन्वय साधला की निवडणूक पार पडते.
निवडणूक आयोगाची काही महत्वाची कामे आहेत.
मतदारसंघ आखणे
मतदारयादी तयार करणे
राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे
अपक्ष उमेदवाराला चिन्ह देणे
उमेदवारपत्रिका तपासणे
निवडणुका पार पाडने
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे.
या सर्व कामात वेगवेगळे सरकारी कर्मचारी मदत करत असतात . शिक्षक , पोलीस हे निवडणूक सुरळीत पार पाडण्यात महत्वाची भूमिका सांभाळतात शिक्षकांकडे निवडणूक पार पाडण्याचे एक महत्वाचे काम असते.निवडणूकीच्या एक दिवस आधी पासून निवडणूक जिथे असते या ठिकाणची माडणी करणे , याद्या तयार करणे , त्याठिकाणील उमेदवारांची ओळख करणे , मशीन ची तपासणी करणे आणि मांडणी करणे ही सर्व कामे हे पाहत असतात.
शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांच्या इतकेच पोलिसांचे काम देखील महत्वाचे आहे . बूथ वर सुव्यवस्था राखणे, मशीन चे रक्षण करणे, अधिकाऱ्यांना सुरक्षा पोहचवणे या सर्व गोष्टी पोलीस पाहतात.