बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच वेब सीरिज घेऊन आले आहेत. त्यांची (heeramandi) ‘हीरामंडी’ ही सीरिज गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. अखेर या सीरिजचे एकूण ८ एपिसोड १ मे रोजी प्रदर्शित झाले. प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहता येईल. ही सीरिज पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.
heeramandi cast
संजय लीला भन्साळी यांच्या सीरिजमध्ये मनीषा कोईलारा, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शेखर सुमन, फरदीन खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
गेल्या १८ वर्षांपासून संजय लीला भन्साळी यांच्या डोक्यात हिरामंडी साकारण्याची संकल्पना होती.
लाहोरच्या ऐतिहासिक बादशाही मशीदीपासून ७०० मीटर दूर असलेल्या या भागात स्वतःला शरीफ म्हणणारे लोक दिवसा फिरतही नाहीत. त्यांच्या डोक्यात या सीरिजमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान आणि इम्रान अब्बास यांना घेण्याचा विचार होता. याशिवाय ते या सीरिजमध्ये रेखा, करीना कपूर आणि राणी मुखर्जीला कास्ट करण्याच्या विचारात होते. मात्र त्यांनी इतर कलाकारांची निवड केली आणि या तगड्या कास्टसह ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.
संजय लीला भन्साळी यांनी दि्ग् दर्शित केलेला “गंगुबाई काठीयावाडी” याच्या मोठ्या पडद्यावरील घवघवित यशानंतर भन्साळी यांना” हिरामंडी ” कडून अपेक्षा आहेत.पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला दिसून आला .IMDb नुसार पहिल्या दिवशी १० पैकी ५.५ स्टार्स मिळाले आहेत.पुढील दिवसात कसा प्रतिसाद मिळेल ही बघण्याची बाब असेल.
covishield कहर covishield-vaccine-real-truth
वर्क फ्रॉम होम ऑप्शन शोधताय ? क्लिक करा ईझि जॉब्स
फेसबूक https://www.facebook.com/profile.php?id=61559398190729