drugs addiction – युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर

Share

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे . या मध्ये एक व्यक्ती भरदिवसा इंजेक्शन व्दारे ड्रग्स drugs चे सेवन करताना आढळून येत आहे . सदर व्हिडिओ हा दिल्ली मधला असून या मध्ये ई – रिक्षा चालक आमली पदार्थाचे (drugs) सेवन करताना दिसून येत आहे .

 

 

 

भारतामध्ये आमली पदार्थाचे सेवन करणे (drugs addiction) हे जरी नवीन नसले तरी पण त्याचा वाढता वापर आणि नवनवीन पद्धती हा चर्चेचा गंभीर विषय आहे . भारतात तंबाखू , पान मसाला , गुटखा, सुपारी , मशेरी आणि दारू या नशा देणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो. झोप चांगली येणे , कामाची गती वाढणे, कामात मन लागणे,भूक कमी होणे . या सर्व कारणांमुळे पूर्वी लोक नशा करत असे.

पण सध्याच्या काळात नशा ही एक मोजमजेचे साधन झाले आहे .वेगवेगळ्या पदार्थांची यात भर पडली आहे . सिगारेट युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.(drugs addiction) त्यामध्ये होत असेला तंबाखूचा वापर आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेलं कॅन्सर च प्रमाण यावर चर्चा करणे गरजेचे आहे.

भारतात हेरॉईन, मारिजुआना,LSD, कोकेन, मेथ यासारखे अनेक ड्रग्स (drugs)तरुणांना आकर्षित करत आहेत . या मध्ये भारतात पंजाब,उत्तर प्रदेश, गोवा , महाराष्ट्र या राज्यांमध्ये युवकांमध्ये ड्रग्स वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात दर वर्षी ड्रग्स च्या अतिसेवनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतात २०२२ साली ६८१  लोकांचा तर २०२३ वर्षी १५९ लोकांचा मृत्यू मे महिन्यांपर्यंत झाला .

ड्रग्सच्या नशेत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे .शरीरास हानिकारक असलेले ड्रग्स सहज सहजी मिळू लागले आहेत. याला जबाबदार कोण आणि हे सर्व  रोखण्यासाठी काय करायला हवा हा चर्चेचा विषय आहे .

लेटेस्ट मराठी न्यूज साठी नक्की क्लिक करा https://knowit4u.com/
वर्क फ्रॉम होम ऑप्शन झटपट शोधण्यासाठी ईझि जॉब्स

Share

Leave a Comment