IPL 2024jadeja out – जडेजा झाला ‘वेगळ्या पद्धतीने बाद’.आयपीएल २०२४ मधील सामना क्रमांक ६१ गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि या मोसमात कमालीच्या फॉर्म मध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्स यांच्या मध्ये खेळला गेला .हा सामना चेन्नई ने ५ गडी राखून जिंकला असला तरी हा सामना अजून एका गोष्टी मुळे चर्चेत आला तो म्हणजे रवींद्र जडेजा ची विकेट.
सामन्यातील १६ व्या षटकच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने आवेश खानच्या गोलंदाजी वर चेंडू थर्ड मँन च्या दिशेने सरकवला. त्यावर एक धाव मिळाल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी परत येत होता.
ऋतुराज ने त्यांना नकार दिला. परंतु जाडेजाने तोपर्यंत खूप अंतर पार केले होते. फिल्डरने बॉल कीपर संजू सॅमसन कडे फेकला .त्याने नॉन स्ट्रायकर एंड जडेजा ला रन आऊट करण्यासाठी चेंडू फेकला पण तो जडेजा च्या कोपऱ्यात लागला.
संजू सॅमसन ने या गोष्टी वर आक्षेप घेत अपील केली. ऑन फील्ड अंपायर ने हा निकाल तिसऱ्या अंपायर कडे पाठवला . त्यांनी याला “ऑब्स्ट्रक्शन ऑफ फील्ड ” च्या नुसार आऊट घोषित केले.. या निर्णयामुळे रवींद्र जडेजा खुश नव्हता.
पण रिप्ले मध्ये स्पष्ट दिसत होते की रवींद्र जडेजा ने चेंडू बघून जाणूनबुजून चेंडूच्या रस्त्यात आला ज्याने चेंडू यष्टी वर अधळून तो बाद होणार नाही.
काय आहे “ऑब्स्ट्रक्शन ऑफ फील्ड”-
MCC लॉ ऑफ क्रिकेट रुल नुसार जर एखादा खेळाडू जाणीव पूर्वक शरीराचा कोणताही भाग चेंडू आणि यष्टी यांच्या मध्ये आणत असेल तर त्या खेळाडूला बाद म्हणून घोषित केले जाते. जर चेंडू दोन वेळा बॅट ने टोलवला तरीही तो खेळाडू बाद म्हणून घोषित केला जातो. युसूफ पठाण आणि अमित मिश्रा यांच्या नंतर रवींद्र जडेजा हा फक्त तिसरा खेळाडू आहे जो या नियमाचा शिकार झाला आहे.
अधिक आयपीएल अपडेट साठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम चे असंख्य ऑप्शन आणि कसे करावे याचे मार्गदर्शन जाणून घ्या