Ireland vs Pakistan-आयर्लंड ने पाकिस्तान वर मिळवला इतिहासिक विजय.

Share

Ireland vs Pakistan सध्या सर्वत्र क्रिकेटचे वारे वाहत आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचली तरी प्ले ऑफ मध्ये कोणते चार संघ असतील याची उत्सुकता कायम आहे. आयपीएल मध्ये सर्व जन गुंतलेले असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आयर्लंड ने पाकिस्तान वर इतिहासिक विजय मिळवला आहे.

पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांची ३ सामन्यांची टी -२० मालिका आयर्लंड येथे होत आहेत. या मालिके साठी पाकिस्तान संघांनी जय्यत तयारी केली होती. परंतु आयर्लंडचा संघ पाकिस्तान संघ वरचढ ठरला.
पहिल्या सामन्यात आयर्लंड ने टॉस जिंकत पाहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात मोहम्मद रिझवान रन आऊट झाला. परंतु दुसऱ्या विकेट साठी सैम अयुब आणि बाबर आझम यांच्यात ८५ धावांची भागीदारी झाली. बाबर आझमने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार याच्या मदतीने ५७ धावा केल्या त्याच्या सोबत सैम आयुबने ४ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने २९ चेंडूत ४५ धावा केल्या.
पाकिस्तान ची मधली फळी जास्त वेळ पिच वर टिकली नाही . इफ्तिकार अहमद यांच्या झंझावत १५चेंडूवर ३७ धावांमुळे पाकिस्तान ६ बळी खर्चून १८२ धावा बनाऊ शकला.   आयर्लंड कडून क्रेग यंग याने २७धावा देत २ बळी घेतले .
आयर्लंड ने विजयासाठी असलेले १८३ धावांचे लक्ष १९.५ ओवर्स मध्ये पार केला.आणि पाकिस्तान वर १चेंडू राखत विजय मिळवला सामनावीर Andrew balbirnie याने ५५ चेंडूत ७७ धावा बनवल्या त्याने २ षटकार आणि १० चौकरांच्या मदतीने विजय खेचून आणला. त्याला हॅरी टेक्टर याने महत्त्व पूर्ण साथ दिली.

पाकिस्तान संघाची तयारी.

पाकिस्तान संघ पूर्ण तयारीनिशी उतरला होता. मागील ६ महिन्यात पाकिस्तान मॅनेजमेंट ने निवड समिती पासून कर्णधार बदल केले आहेत. आगामी टी २० वर्ल्ड कपच्या तयारी साठी पाकिस्तान संघाने आर्मी स्कूल मध्ये देखील प्रशिक्षण घेतले . पण त्याचा काही फायदा झाला नाही असे दिसून येते.

अधिक क्रीडा क्षेत्रातल्या बातम्यांसाठी क्लिक करा

वर्क फ्रॉम होम असे सुरू करा जाणून घ्या


Share

Leave a Comment