Lokasabha election 2024: मोदींच्या प्रस्तावाला पवारांकडून प्रत्युत्तर. नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्यांना एक ऑफर दिली होती.
त्यांनी नंदुरबार येथे झालेल्या डॉ. हिना गावित यांच्याप्रचार सभेत शरद पवार यांच्या एनसीपी काँग्रेस मध्ये विलीन न करता एनडीए मध्ये विलीन करावा असे म्हणले होतो.
या वक्तव्यावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांना या बद्दल विचारले असता “नरेंद्र मोदी सध्या वारंवार महाराष्ट्रात येतात” असा मजेशीर टोला देखील त्यांनी लगावला.
शरद पवार पुढे म्हणाले, “आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.”
गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही”, असे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले.
मराठी बातम्या आणि अपडेट साठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम चे ७० हून अधिक ऑप्शन जाणून घ्या