Loksabha election 2024 – रोहित पवार यांना मंचावर कोसळले रडू. अजित पवार यांनी केली नक्कल.

Share

Loksabha election 2024 – रोहित पवार यांना मंचावर कोसळले  रडू. अजित पवार यांनी केली नक्कल.
बारामती मतदान संघातील लढत सध्या नणंद आणि वहिनी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा  पवार यांच्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. या बरोबरच काका आणि पुतण्या यांच्यातील लढत व त्याचे समीकरण याबद्दल महाराष्ट्राला वेगळा सांगायची गरज नाही.
परंतु रविवार (दि.५) रोजी घेतल्या गेलेल्या प्रचार सभेत काका – पुतण्या ची चांगलीच जुंपलेली दिसून आली .परंतु या वेळी अजितदादा पवार यांच्या समोर होते रोहित दादा पवार.

 

 

 

रविवारी बारामती येथे झालेल्या सभेत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली होती त्या मध्ये शरद पवार,खासदार अमोल कोल्हे ,आमदार रोहितदादा पवार उपस्थित होते .
या दरम्यान सभेत भाषण करताना रोहित दादा पवार शरद पवार यांचा एक प्रसंग सांगताना भवून झाल्याचे दिसून आले.ते म्हणाले ” ज्यावेळी पक्ष फुटला तेव्हा आम्ही सगळे साहेबांकडे पाहत होतो. टिव्हीवर ते बातम्या पाहत होते.

मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव दिसले नाहीत.ते फक्त एवढेच म्हणले ‘ काळजी करू नका आपण नवीन पिढी तयार करू आणि जो पर्यंत नवीन पिढी जबाबदारी घेण्याईथपर्यंत सक्षम होत नाही,तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही” या वेळी रोहित पवार यांचे डोळे पाणावले आणि मंचावरच त्यांना रडू कोसळले.

त्याच वेळी वरवंड (ता.दौंड) येथे भाजप आणि मित्र पक्ष यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेत भाषण करताना अजित पवारांनी रोहित पवार यांची नक्कल केली.

 

 

 

ताज्या आणि झटपट मराठी बातम्यांसाठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम शोधताय ? क्लिक करा

Share

Leave a Comment