Loksabha elections 2024- बारामतीत लढत घमासान होण्याची चिन्ह! सुप्रिया सुळे यांनी सभेत दिले संकेत.
२०२४ हे वर्ष आगामी लोकसभा निवडणुकीमुळे लक्षात राहणार आहे. काका विरुद्ध पुतण्या ,वहिनी विरुद्ध नणंद यांच्या इतिहासिक लढति होणार आहेत.
बारामती मतदार संघातून एकूण ३८ उमेदवार या निवडणुकीला उभे राहिले आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीला बारामती मदातर संघातून सुप्रिया सुळे यांना खासदार पदावर निवडून दिले होते.परंतु सदर वर्षी त्यांच्या समोर भाजप व मित्रपक्ष यांच्या कडून सुनेत्रा पवार यांचे आवाहन असणार आहे.
दोन्हीही पक्ष आप आपला प्रचार जोरात करत आहेत .यातच रविवार (दि.५ मे) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी सभा घेतली.
बारामती मधील कसबा या ठिकाणी रविवारी सभा पार पडली.यात अनेक गोष्टींवर खंत व्यक्त करण्यात आली.भावनिक वतावरणात ही सभा पार पडली.
मोठा भाऊ म्हणून तुमचा सन्मान केला, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होती. मात्र आता आमची लढाई घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आहे. ते म्हणाले होते, समोरची येतील, भावनिक होतील व शेवटची इलेक्शन आहे, असे सांगतील. मला सर्वात जास्त वाईट या गोष्टीचे वाटले. तुम्ही आमचे दिवस मोजू नका, आता तुम्ही तुमचे दिवस मोजा,” अशा आक्रमक शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
तुम्ही ज्यांना घाबरता त्यांच्या समोर ‘ डंके की चोट पे ‘ उभी राहून भाषण करते असे खणखणीत खडेबोल त्यांनी आपले बंधू अजित पवार यांना सुनावले.
खासदार अमोल कोल्हे देखील या सभेला उपस्थित होते अजित पवारांची नक्कल करत त्यांनी आपली भावना जणते पर्यंत पोहोचवली.रोहित पवारांच्या भावनिक भाषणानंतर सभेची सांगता झाली तत्पूर्वी ” इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला गुढग्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा त्यांनी अजित पवार यांना दिला .
झटपट आणि ताज्या मराठी बातम्यांसाठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम शोधताय ? क्लिक करा