Loksabha elections 2024 – “मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती!” महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्या यांना खूप मान आहे पण २०२३ पासून काका आणि पुतण्या हे काका विरुद्ध पुतण्या असा समीकरण झाले आहे.
अजित पवारांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पासून सर्व समीकरणे बदलली आहेत.
बारामती मतदान संघातील मतदान होताच अजित पवार यांनी शिरूर मतदान संघात प्रचाराला सुरुवात केली आहे .
अजित पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलताना आढलून आले. ते म्हणाले ” जर मी शरद पवार साहेब यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती.
शरद पवार हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही.
         दिवसरात्र सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हाती असायची. मी राजकारणात आल्यापासून १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. मी कधीही कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हतं. १९९२ ते २०१७ या कालावधीत ताब्यात ठेवलं.” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
             मी १९९१ मध्ये जेव्हा खासदारकीला उभा होतो तेव्हा मला शिरुर विधानसभा मतदारसंघाने प्रचंड मतदान केलं होतं. देशात नंबर एकच्या मताने मी निवडून आलो होतो. तेव्हा मतदारसंघ छोटे होते. मी तेव्हाच ठरवलं होतं की राजकीय जीवनात आहे तोपर्यंत बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरुर, पिंपरी चिंचवड, दौंड या सहा मतदारसंघांना आपण विसरायचं नाही. नंतर मतदार संघ बदलले.
             खेड जाऊन शिरुर मतदारसंघ झाला. निवडणुका म्हटलं की ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वेगळ्या. आमदारकीची निवडणूक राज्याचा प्रमुख निवडायची असते. तर आत्ताची निवडणूक ही देशाचा नेता निवडायची आहे हे विसरु नका.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मला साहेबांनी (शरद पवार) सांगितलं ठीक आहे अजित आता मी राजीनामा देतो कारण मलाही हे कुणावर तरी सोपवायचं आहे. मी म्हटलं बघा तुमचा निर्णय आहे. मला काहींनी सांगितलं, तुम्ही या वयात साहेबांना सोडायला नको होतं.
 
              मी सोडतच नव्हतो. मी सांगत होतो तुम्ही घरी बसा, तब्बेतीला सांभाळा, आम्हाला मार्गदर्शन करा. काही सुचवायचं असेल तर सुचवा. मी ३० ते ३२ वर्षे ऐकत आलो आहे. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद नाकारायचं आहे नाकारलं, भाजपाबरोबर जायचं ठीक आहे म्हटलं, शिवसेनेबरोबर जायचं सगळं स्वीकारलं. काँग्रेसला सोडायचं सोडायचं, विदेशी स्त्रीचा मुद्दा त्यांनी काढला होता. आम्ही हू की चू केलं नाही. प्रत्येकाला कुणी तरी संधी दिली. साहेबांनी अजित पवारांनी संधी दिली हो मान्य आहे ना. पण साहेबांनाही यशवंतरावांनी संधी दिली. असंही अजित पवार म्हणाले.
सुप्रिया ताई सुळे यांना अजित पवार यांच्या या वकतव्याबाबत विचारले असता त्यांनी ” तुम्हाला दादा माहीत आहे कसे आहेत” म्हणून प्रक्रिया दिली.
   पवार विरुद्ध पवार क्लिक करा
   वर्क फ्रॉम होम करायचंय पण समजत नाहीये कसं ? क्लिक करा