Loksabha elections 2024 – नरेंद्र मोदींचा शरद पवारांना काँग्रेस मध्ये विलीन न होण्याचा सल्ला! महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत. चौथ्या टप्प्याच्या निवडणुका १३ मे रोजी असणार आहेत. त्यासाठी सर्वत्र प्रचाराचे वरे एकदम जोरात वाहत आहे.
नंदुरबार मतदार संघातील भाजप च्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली . या सभेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.या सभेत त्यांनी जनतेला संबोधित करताना अनेक मोठी वक्तव्य केली.
काय म्हणाले नरेंद्र मोदी –
नरेंद्र मोदी यांनी सभेच्या दरम्यान भाषण करत नंदुरबार मतदारांना डॉ. हिना गावित यांना मत देण्याचे आवाहन केले. या सभेत बोलताना अनेक मोठी वक्तव्य त्यांनी केली.
शरद पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी एनडीए मध्ये विलीन करावी असा सल्ला त्यांनी दिला .
नरेंद्र मोदी म्हणले,”४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत. सध्या ते काहीही भाष्य करत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत. त्यांनी अनेक चांगल्या लोकांबरोबर काही विचार विनिमय करून त्यांनी ते विधान केले असावे. ४ जूननंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं त्यांना वाटलं असेल असंही मोदी म्हणाले.
छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केलं आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अजून काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत.त्यांचा उत्तर काय असेल या कडे आता सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे.