Maharashtra weather – राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. राज्यात गुरुवार बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. अवकाळी पाऊस पडणार की काय अशी चर्चा सुरू झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार पुढील ४ दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार ,रविवार, सोमवार ला वातावरण हे ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत. काही भागात पावसाचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होईल असा असं सांगण्यात आले आहे.
शुक्रवार ,शनिवार, रविवार या तीन दिवशी मध्य महाराष्ट्र , कोकण , विदर्भ , खान्देश, मराठवाडा येथे हवामान विभागाने वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.
उष्णता काही प्रमाणात कमी होईल. परंतु उन्हाची तीव्रता दिवसभर कायम राहील आणि संध्याकाळी गारवा येईल. वादळी वाऱ्याने फळबाग व फळ उत्पादक चिंतेत आहेत.
ताज्या न्यूज अपडेटसाठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम करायचंय ? क्लिक करा