Marathi Horror Story – “आईने आवाज दिला तरी तिच्याकडे बघू नको, ती तुझी आई नाही “

Share

Marathi Horror Story”आईने आवाज दिला तरी तिच्याकडे बघू नको ‘ ती तुझी आई नाही ” जर तुम्ही कोणत्या वडिलांना आपल्या ५ वर्षाच्या मुलीला ” संध्याकाळी ६ नंतर तुझ्या आईच्या जवळ जाऊ नकोस ” असे सांगताना ऐकले तर तुम्हाला पण ते बोलणे विचित्र वाटेल. विचारात पडाल,पण त्या वडिलांच्या चेहऱ्यावरील भयभीत करणारे हावभाव त्यामागील काळजी या सर्वांमध्ये ते लहान चिमुकली चे निरागस डोळे या सर्व प्रकारणे संभ्रमित झाल्याने आपली वाढलेली भीतीपोटी उत्सुकता या सर्वांना चिरत त्या वडिलांचा भयभीत आवाज कानी पडला .
वडिलांच्या आवाजातील भयत्यामुळे त्यांच्या आवाजातील कंप यामुळे अजून भय वाढत होते.त्यांनी सांगायला सुरुवात केली. दीपक यांचा विवाह रूपा हिच्याशी झाला होता लग्नाला २ वर्ष होवूनही आपल्याला मुल होत नाही म्हणून दोघेही चिंतेत होते अशातच त्यांच्या आनंदाला सीमा राहीली नाही कारण बातमीच अशी होती. त्यांना मुल होणार होते .त्यातच दीपक याची बदली एका गावात झाली . ते दोघे ही तिथे राहायला गेले .घर छान होते ,घराला आंगण ,अंगणात मोठे डेरेदार चिंचेचे झाड त्यामुळे परिसर छान वाटत होता.
दोघे ही त्यांची काळजी घेत होते.सर्व चांगले चालले होते . डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचे दीपक ने ठरवले  सर्व पाहुणे ,जवळचे,मित्र सर्व आले होते. अंगणात झाडा खाली कार्यक्रम करायचे ठरवले.
कार्यक्रम छान सुरू होता . पण त्या अंधारात काही घटना घडून गेल्या होत्या ज्या अंधारात तशाच कोणाला ही न दिसता धुपत होत्या.
ते फार वर्ष जुन झाड होत त्याने अनेक गोष्टी बघितल्या आणि सामावून घेतल्या होत्या. त्या झाडाच्या मुळाशी होती एक महिला अनेक वर्ष पूर्वी तिच्याच  पती ने तिच्यावर अत्याचार करून तिला मारून झाडाच्या पायथ्याला पुरले होते .
कार्यक्रम पार पडला .सर्व सुरळीत चाललं होतं .थोड्याच दिवसात त्यांच्या आनंदाला वाढवण्यासाठी  एक लहान मुलगी जन्माला आली. सर्व खुश होते .दिवस उलटत गेले . मुलगी खुशी मोठी होत होती.
अशातच खुशी ५ वर्षाची झाली . एका रात्री अचानक दीपक ची झोप मोड झाली आणि त्याला कळलं की रूपा जवळ नाहीये. खोलीत अंधार होता म्हणून त्याने टेबल लॅम्प ची लाईट लावली. मनात थोडा धस्स झाल .कारण रूपा बाळाच्या जवळ उभी होती तिला एकटक बघत होती 5 मिनिट झाले तरीही ती तशीच होती . चेहऱ्यावर मंद हास्य त्याने ती अजूनही भीतीदायक वाटत होती.
              दीपक ने त्याकडे दुर्लक्ष केले पण हे वाढतच चालले होतो .रात्र झाली की रूपा खुशी  कडे एक टक पाहत बसायची आणि हसायची.हे आता थोड्या दिवसांनी संध्याकाळी ही व्हायला लागला . ती कामं सोडून खुशीकडे  एक टक बघत बसायची . तिच तासनतास हे चालायचं.दीपकला काळजी वाटू लागली.
त्याने एकदा तिला झटकल आणि विचारल तू काय करते? तिचा चेहरा गंभीर झाला. आवाज बदलला .थोडा खोल झाला . तिनी दीपक कडे  बघितल .खोलीत थोडा अंधार होता तरी तिचे लालबुंद डोळे त्याला दिसले . तिने उत्तर दिले .” हिला न्यायला आले” दीपक ने आश्चर्याने विचारले “कोण आणि कोणाला कुठे न्यायचे तुला?”
ती पुढे म्हणाली,’ माझ्या सोबत ‘ आणि हसायला लागली. त्याला भीती वाटत होती पण मुली साठी तो खंबीर राहिला . त्याने कसे बसे खुशिला जवळ घेतले आणि खोलीच्या बाहेर पळून गेला . व तिला त्या खोलीत बंद केले .
                त्याने थोडी  विचारपूस केल्यावर त्याला समजले . खूप वर्षांपूर्वी याच झाडा खाली एका महिलेला तिच्या पतीने मारून पुरले होते. तेव्हा तिला तिच्या ५ वर्षाच्या मुलीला भेटायचे होते . तिची अंतिम इच्छा पूर्ण झाली नसल्याने खुशी 5 वर्षाची होईपर्यंत तिनी वाट बघितली.
घरात भीतीचा वातावरण होते . दीपक ने संध्याकाळी ६ नंतर रूपा ला एका खोलीत बंद करून ठेवायचा निर्णय घेतला . ती रात्र खूप मोठी होती.रात्रभर तिचा रडण्याचा आवाज दीपकला येत होता . तो पूर्ण रात्र झोपला नव्हता .सकाळ झाली. दीपक घाबरत घाबरत त्या खोलीच्या शेजारी गेला . हळूच दार उघडले . आत गेला तर त्याच्या अंगावर शहारे आले . अंग कपू लागले. रूपा जमिनीवर पडली होती रक्ताच्या थारोळ्यात.
रूपाचा मृत्यू झाला होता . तिची अंतिम इच्छा काय? हे कसे झाले? कोणी केले ? हे सर्व थांबणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे रूपा सोबतच राहिली.

झटपट व ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम शोधताय ? क्लिक करा

Share

Leave a Comment