Sunita williams – भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा जाणार अवकाशात.अंतराळवीर राकेश शर्मा , कल्पना चावला ल्यांच्या नंतर सुनिता विल्यम्स या भारतीय वंशाच्या तिसऱ्या अंतराळवीर ठरल्या होत्या .५८ वर्षाच्या सुनिता विल्यम्स या तिसऱ्यांदा अवकाशात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांनी या पूर्वी ही कामगिरी २००६ आणि २०१२ या वर्षी केलेली आहे.
सुनीता विल्यम्स तब्बल तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी हे अंतराळयान सुनीता यांना घेऊन अवकाशात झेपावणारे होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी झेप रद्द करण्यात आली आहे. परंतु पुढील काहीच दिवसात सुनिता विल्यम्स पुन्हा अवकाशात झेपावणारे आहेत. त्यांच्यासोबत बूच विल्मर हे अंतराळवीर देखील असणार .
६१ वर्षीय बूच विल्मर यांनी देखील या पूर्वी २ अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतला होता .२०११ मध्ये अवकाश स्थानकापर्यंत ११ दिवसांची म्हीम त्यांनी राबवली होती.
मंगळवारी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मंगळवारी तिसऱ्यांदा अवकाशात झेपवण्यासाठी सज्ज होत्या. बोइंग स्टारलायनर हे अंतराळ यान त्यांना घेऊन उड्डाण करणार होते. ज्येष्ठ अंतराळवीर बुच’ विल्मोर त्यांच्यासोबत होते. दोघेही कॅप्सूलमध्ये गेले. त्यांना सुरक्षा पट्टेही लावण्यात आले, मात्र त्यांना घेऊन जाणाऱ्या आटलास रॉकेटच्या बिघाड असल्याचे ध्यानात आले. बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अपेक्षित वेळेत दुरुस्ती होऊ शकली नाही, मोहीम पुढे ढकलली गेली.
सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे लवकरच अवकाशात झेपावतील.
९ डिसेंबर २००६ रोजी त्या अंतराळात गेल्या होत्या .त्यांनी २००६ आणि २०१२ मध्ये त्या अवकाशात गेल्या होत्या. त्यांनी तब्बल ३२२ दिवस अवकाशात राहिल्या असून एकूण ५० तास ४० मिनिट असा विक्रमी स्पेस वॉक त्यांनी केला आहे.
‘या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आम्ही उड्डाणस्थळी दाखल झालो आहोत. या मोहिमेबाबत आम्ही आमच्या मित्रांशी व कुटुंबीयांशी बोललो.
आम्ही या मोहिमेचा एक भाग असल्याचा त्यांना खूप आनंद झाला आहे व त्यांना आमचा अभिमान वाटतो,
असे त्यांनी मोहिम पूर्वी बोलताना सांगितले.