Sunrisers Vs Super Giants – केएल राहुलला चांगलेच खडे बोल सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या आयपीएल सामन्यात संघाचा 10 विकेटने पराभव झाल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सचा मालक आणि कर्णधार केएल राहुलसोबत मैदानावर गरमागरमीचे वातावरण दिसले
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १० गडी राखून पराभव झाल्याने रागावलेले लखनौ सुपर जायंट संघाचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुल याला चांगलेच खडे बोल सुनावले.
सामना संपल्या नंतर संजीव गोयंका आपल्या कर्णधाराशी बोलताना दिसून आले. त्यांचे हावभाव आणि देहबोली सर्व क्रिकेट चाहत्यांना अचंबित करणारी होती . कर्णधार के एल राहुल निमूतपणे मान खाली घालून ऐकत असताना दिसून आला . त्यामुळे चाहत्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.
पराभवामुळे निराश असलेले संजीव गोयंका यांचा पारा काहीसा चढलेला दिसून येत होता. त्यातच के एल राहुल शांतपणे उभा राहून सर्व ऐकत होता.
समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आले होते की राहुल पुढील काही समण्या साठी कर्णधार पद सोडणार आहे . या गोष्टीत किती तथ्य आहे हे पुढील लढती मध्येच दिसून येईल.कारण याची पुष्टी संघ मॅनेजमेंट नी केलेली नाही.
कर्णधार पदा बरोबरच चर्चा पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शन बद्दलही होत होत्या . राहुलला लखनौ सोडून देईल असे बोलण्यात येऊ लागले होते.
या सर्व चर्चांना तडा देत संजीव गोयंका यांनी विधान जाहीर केले आहे ते म्हणाले,” आपल्या सर्वांना हा खेळ आवडतो.आणि पराभवामुळे राहुल इतकाच मी देखील नाराज होतो त्यामुळे मी त्याला फक्त काही टिप्स देत होतो. राहुल हा उत्तम कर्णधार असून तो पुढील वर्षी लखनौ चा भाग असेल ” असे त्यांनी सांगितले.
कोण आहेत संजीव गोयंका?
संजीव गोयंका हे RP- SG ग्रुप चे मालक आहेत. त्याचबरोबर ते आयपीएल मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक आहेत. त्यांचा जन्म कोलकाताच्या
आयएसएल ( इंडियन सुपर लिग) या भारतीय फुटबॉल टुर्नामेंट मध्ये मोहन बागण सुपर जायंट्स चे मालक देखील आहे.
ही त्यांची पहिली वेळ नसून २०१६ मध्ये त्यांनी भर मैदानात भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यालाही सुनावले होते. तेव्हा ते रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघाचे मालक होते.त्या वर्षी संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यास असफल ठरला होता .त्यानंतर पुढील सीझन ला त्यांनी कर्णधारपदी स्टीव्हन स्मिथ याची निवड केली होती .
आयपीएल उपडतेस तेही झटपट क्लिक करा
वर्क फ्रॉम होम चे असंख्य ऑप्शनस् जाणून घ्यायचेत का ? क्लिक करा