Team India head coach 2024 – ५ वेळा जेतेपद मिळवून देणारे स्टीफन फ्लेमिंग्ज बनणार टीम इंडिया चे नवे प्रशिक्षक. टीम इंडिया चे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघासोबत भरीव कामगिरी केली परंतु आगामी टी-20 वर्ल्डकप हा अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
बीसीसीआय ने या बाबत काही औपचारिक घोषणा केली नाही परंतु मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सीएसके संघाचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
फ्लेमिंगला या भूमिकेसाठी योग्य उमेदवार मानले जात आहे. IPL मधील CSK सोबतचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड, मॅनेजमेंट स्किल्स आणि युवा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम गोष्टी आणण्याची क्षमता यामुळे BCCI ने त्याला बोर्डात घेण्यास प्रवृत्त केले.
दरम्यान, अद्याप तरी फ्लेमिंग यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. जर नसेल केला, तर ते येत्या काळात अर्ज करणार का हे पाहावे लागणार आहे.
तसेच जर हा अर्ज त्यांनी केला आणि त्यांना भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले, तर मात्र त्यांना चेन्नईचे मुख्य प्रशिक्षकपद सोडावे लागेल. फ्लेमिंग यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे जस्टिन लँगर आणि टॉम मूडी यांच्याही नावाची चर्चा आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्टी अशी की भारतीय संघासाठी बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती जो प्रशिक्षक निवडणार आहे, तो तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी असणार आहे. तसेच जय शाह यांनी
यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे हा प्रशिक्षक दीर्घकाळासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्याच्याबरोबर पहिला करार साडेतीन वर्षांचा असणार आहे. म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे.
अधिक मराठी बातम्यांसाठी क्लिक करा
वर्क फ्रॉम होम करायचंय ? क्लिक करा