T20 Worldcup final team -के. एल.राहुलला संघात स्थान नाही.

Share

टी-२० विश्वचषक (T20 worldcup) २०२४ साठी संघाची घोषणा करण्यात आली आहे . आजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे .
कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा सांभाळणार असून उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्या यास निवडले आहे .
संघात कधी मोठे बदल केले गेले आहेत. के. एल.राहुल याला संघात स्थान मिळवण्यात यश आले नाही. त्याच्या जागी यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांना पसंती दिली आहे .
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर ओपनिंग ची जबाबदारी असून किंग कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असणे आहे.किंग कोहली या आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप च मानकरी आहे त्यांनी १० सामन्यात ५०० धावा केल्या आहेत.

 

अष्टपैलू खेळाडूंची वर्णी

भारतीय(T20 worldcup) संघात ४ अष्टपैलू खेळाडूंची निवड करण्यात आली आहे .  या मध्ये हार्दिक पंड्या , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. शिवम दुबे हा सध्या कमालीच्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे त्याची निवड व्हावी अशी मागणी केली जात होती . मधल्या षटकात येवून धडाकेबाज खेळी करणी हे यामागचे कारण.

कुल-चा पुन्हा एकत्र

२०२२ च्या टी २०(T20 worldcup)  संघातून वगळल्या नंतर पुन्हा युजवेंद्र चहल भारतीय संघात परतला आहे. आईपीएल च्या इतिहासात २०० बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे . त्यासोबत कुलदीप यादव , रवींद्र जडेजा आणि अक्षर
पटेल यांच्या कडे स्पिन गोलंदाजीची घुरा सोपवली आहे.

वेगवान गोलंदाजीत धार

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्यामुळे वेगवान गोलंदाजीत धार आली आहे.

शुभमन गील, रिंकू सिंग यांना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे यांच्या सोबत आवेश खान आणि खलील अहमद हे देखील आहेत
टी २० विश्वचषक (T20 worldcup)२०२४ १ ते २९ जून दरम्यान  यु.एस.ए. येथे असणार आहे . या साठी भारतीय संघ २१ मे रोजी रवाना होणार आहे .२० संघ असलेला हा विश्वचषक या मध्ये ४ गट आहेत . भारतीय संघ A  गटात आहे . या गटात पाकिस्तान , आयर्लंड,कॅनडा आणि यू.एस.ए. यांचा समावेश आहे.

 

लेटेस्ट मराठी न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा https://knowit4u.com/

 

वर्क फ्रॉम होम करायचंय ? ईझि जॉब्स

 

फेसबूक https://www.facebook.com/profile.php?id=61559398190729

 

 


Share

Leave a Comment